वाशिम :- जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षात वाशिम पोलीसांनकडुन धडक मोहिमा राबवुन अवैध गांज्या विक्री करणाऱ्या इसमावर रेड करुन गुन्हे दाखल केले आहे. दिनांक 09/02/2026 रोजी संध्याकाळी एक इसम गांज्या घेवुन अकोला वरुन शेलु बाजार येथे येत असल्या बाबत गुप्तमाहिती मिळाली. वरुन पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी त्वरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पेट्रोलींगवर असनाऱ्या दोन टिम तयार करुन शेलुबाजार कडे रवाना केल्या. तसेच पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील पोलीस स्टँफ यांचे मदतीने तसेच सोबत पंच घेवुन सापळा रचुन वाट पाहत असता एक इसम बँग घेवुन संययीत रित्या येत असल्याचे दिसला त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव सोनु उर्फ शेख राजीक शेख मोहम्मद वय 26 वर्ष रा शेलुबाजार ता. मंगरुळपीर जि वाशिम असे सांगीतले तसेच त्याच्या जवळील बँगची झडती घेतली असता त्याचे बँग मध्ये 02 किलो सदृश्य गांज्या किंमत 40,000/- रुपयाचा मिळुन आला त्याचा जागीच पंचनामा करुन सदर इसमास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन मंगरुळपिर येथे आणुन कलम 8 (क), 20 (ब) (ii) NDPS Act नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मँडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोलीस निरीक्षक किशोर शेळके पोलीस स्टेशन मंगरुळपीर, पोउपनि / शेखर मास्कर, व स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील पोलीस अंमलदार यांनी अथम परीश्रम घेतले. तसेच जिल्ह्यात कोणी अवैध गांज्या विक्री करत असेल त्याची माहिती नियंत्रण कक्ष वाशिम यांना देवुन वाशिम पोलीस यांना सहकार्य करणे बाबत सुचित करण्यात आले आहे.

