वाशिम : पोलीस अधिक्षक सा.वाशिम यांचा दारु व जुगार अड्ड्यावर रेड करणेबाबत स्पेशल ड्राईव्ह संबंधाने आदेश असल्याने पो स्टे मानोरा परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत गुप्त खबर मिळाली की, ग्राम सेवादासनगर येथे राहणारा भिमराव हिरासिंग जाधव, रा. सेवादासनगर हा त्याच्या राहत्या घराच्या गोठ्यामध्ये गावरान हात भट्टी दारु गाळतो व विक्री करतो.
सदर गोपनीय माहीतीच्या अनुषंगाने पो.नि.नैना पोहेकर, सोबत पोहेकाँ राधेश्याम महल्ले, गणेश राठोड, पोकाँ रोहन तायडे, चेतन राउत, अनिल दहातोंडे, मपोकाँ सुषमा लोखंडे व चापोहेकाँ करण चव्हाण असे मिळालेल्या गुप्त बातमी मार्फत आरोपीच्या घरी जावुन पंचासमक्ष आरोपीच्या गोठ्याची झडती घेतली असता झडतीमध्ये 1) 6 प्लॉस्टिक ड्रम मध्ये सडवा मोहमाच. 1 ड्रम मध्ये 300 लिटर प्रमाणे 1800 लिटर, किंमत 1,80,000/- रु, 2) 3 टोपल्यामध्ये सडवा मोहमाच. 1 टोपली मध्ये 50 लिटर प्रमाणे 150 लिटर, किंमत 15,000/- रु, 3) एका कॅनमध्ये 100 लिटर गावराण हातभट्टी दारु किंमत 10,000/ रु., 4) हातभट्टीसाठी लागणारे साहित्य किंमत 13,000/- रु असा एकुण 2,18,000/- रु चा मुद्देमाल मिळुन आला. गावरान हातभट्टी दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होउन मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येत आहे. तसेच सदरची दारु ही प्रमाणीत नसल्याने लोकांच्या आरोग्याशी सुध्दा खेळले जात आहेत. सदरच्या कार्यवाही मुळे महिला, भगिनी मध्ये आनंदाची लहर आलेली आहे तसेच सदरच्या कार्यवाहीमुळे अवैध्य गावरान हातभट्टी दारु गाळणाऱ्या लोकांवर वचक बसलेला आहे. नागरिकांना आव्हान आहे की, त्यांचे परीसरात कुठेही अवैध्य धंदे असल्यास त्याची माहीती द्यावी. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
सदरची कामगिरी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.श्री निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनिष ठाकरे सर यांचे मार्गदर्शनात पो स्टे मानोरा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती नैना पोहेकर व त्यांचे पथक पोहवा राधेश्याम महल्ले, गणेश राठोड, पोकाँ रोहन तायडे, चेतन राउत, अनिल दहातोंडे, मपोकाँ सुषमा लोखंडे, चापोहेकाँ करण चव्हाण यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकाँ गणेश राठोड करीत आहेत.

