वाशिम;- २०२७ चे कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
टेक्नीकल असिस्टंट १४ पदासाठी तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या १ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही नियुक्ती १८ महिन्यांच्या कालावधीसाठी तहसील कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
टेक्नीकल असिस्टंट पदासाठी एकूण १४ पदे उपलब्ध असून मासिक मानधन २५ हजार रुपये इतके राहणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर, इंग्रजी व मराठी टायपिंगचे आवश्यक वेग, एमएस-सीआयटी उत्तीर्ण व किमान एक वर्षाचा शासकीय/निमशासकीय कार्यालयातील डेटा एन्ट्रीचा अनुभव असणे आवश्यक आहे. डिजिटल अॅप्लिकेशन हाताळण्याची क्षमता, उच्च शिक्षण व संगणक विषयक अतिरिक्त पात्रता असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १ पद उपलब्ध असून मासिक मानधन १८ हजार राहील. या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, उच्च शिक्षण व संबंधित अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना मूळ कागदपत्रे, त्याच्या छायांकित प्रती व पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. दुपारी १ नंतर येणाऱ्या उमेदवारांचा तसेच ई-मेल किंवा पोस्टाद्वारे प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

