वाशिम :- जिल्ह्यामध्ये मागील काहीं वर्षात वाशिम पोलीसांनकडुन धडक मोहिमा राबवुन वाशिम जिल्ह्यात गुन्हे करणारे गुन्हेगार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. तसेच वाशिम मध्ये मोटार सायकल चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्यात आले आहे.
दिनांक 24/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या टिमला माहिती मिळाली कि, ग्राम तोडगांव येथे राहणारा व मोटार सायकल चोरणारा इसम हा गांवात आला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना तात्काळ सपोनि जगदिश बांगर यांचे सोबत एक टिम तयार करुन आरोपी शोध करीता तोंडगाव येथे रवाना केले. ग्राम तोंडगांव येथे पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळताच यातील आरोपी हा गावातुन पलायण करण्याच्या तयारीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमने त्याचा पाठलाग करुन गावातील शेतशिवारातुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीचे नांव आदर्श जिवन कांबळे रा. तोंडगांव ता.जि. वाशिम असुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांने पोलीस स्टेशन शिरपुर येथुन होन्डा कंपनीची युनिकाँन मोटार सायकल त्याचा साथीदार श्रेयस गणेश पाचपिल्ले रा. खामगांव जिन, वाशिम ता.जि. वाशिम यांचे सोबत मिळुन चोरी केल्याचे सांगीतले. वरुन श्रेयस गणेश पाचपिल्ले याचा वाशिम शहरात शोध घेतला असता तो ग्राम काटा रोडने येत असल्याचे समजले वरुन स्थानिक गुन्हे शाखेची एक टिम यांनी काटा रोडवर थांबुन सदर आरोपी येताच त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी वाशिम जिल्ह्यातील ग्राम शिरपुर, रिठद, व हिंगोली जिल्ह्यातील माळशेलु येथुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले. चोरी गेलेल्या मोटार सायकल हिंगोली व वाशिम येथुन हस्तगत करुन व गुन्हा करतांनी वापरण्यात आलेली एक मोटर सायकल अश्या एकुण 04 मोटार सायकल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आली. सदर आरोपीतांना पोलीस स्टेशन शिरपुरच्या ताब्यात देण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे. जिल्ह्यात चोरी गेलेल्या आणखी मोटार सायकल मिळण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नवदिप अगरवाल, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि जगदिश बांगर व टिम ने अथक परीश्रम घेतले आहे.

