वाशिम:- ४ मार्च राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त वाशिम मंडळांतर्गत तांत्रिक कामगार युनियन (रजि. क्र. ५०५९) यांच्या वतीने मंडळ कार्यालय वाशिम परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा उपक्रम संघटनेच्या “नवी दिशा – नवा विचार” या संकल्पनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला वाशिम विभागाचे कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण प्रमुख उपस्थित होते. या वेळी प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाशिम उपविभाग हरीश गिर्हे उपस्थित होते. कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण साहेब यांच्या हस्ते स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला.
याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळ कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाणे, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, तांत्रिक टाइम्स उपसंपादक विवेक बोरकर, प्रकाश वाघ, किरण कराळे, राम गोटे, माणिक आकमार, राम कुटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांना संघटनेच्या वतीने सुरक्षा प्रतिज्ञा फोटोफ्रेम भेट देण्यात आली. तसेच सर्व अधिकारी, अभियंते व तांत्रिक कामगार यांनी सामूहिकरित्या सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. संघटनेच्या वतीने सुरक्षा प्रतिज्ञा पत्रकांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तांत्रिक कामगार युनियनचे मंडळ अध्यक्ष गणेश पोधाडे, सचिव मेहराज मिर्झा, विभागीय अध्यक्ष विशाल चव्हाण, सचिव विनायक मुठाळ, माणिक तट्टू, मनीष राठी, राजू तिरके, संतोष गोरे, प्रतीक ठोंबे, शुधोधन कांबळे, मीना सावरकर, घुगे मॅडम, अर्जुन बेंडवाले, रवी कालबांडे, माधव शिंदे, महादेव गोरे, मोहन लहाणे, विशाल इंगळे, शुभम खडसे यांच्या सह मंडळ, विभाग, उपविभाग पदाधिकारी व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अधिकारी व तांत्रिक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी व संघटित शक्तीचा संदेश देणारा ठरला.

