वाशिम :- मा. निकेश खाटमोडे-पाटील यांनी वाशिम जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्या पासुन वाशिम जिल्हामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्या करीता पोलीस विभागाकडुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी अवैद्य दारु, जुगार, गुटखा तसेच शस्त्र अधिनियम प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना वचक निर्माण करण्याबाबत पोलीस विभागाला सुचना दिल्या आहेत.
पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानीक गुन्हे शाखा यांना वाशिम जिल्हा अंतर्गत पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम मोहगव्हाण येथील धरणाचे काठावर काही लोक गावठी हातभट्टी ची दारु गाळतात अशी खात्री लायक माहीती मिळाल्या वरुन दिनांक 12/05/2026 रोजी स्थानीक गुन्हे शाखा वाशिम चे एक पथक तयार करुन ग्राम मोहगव्हाण परीसरात सकाळी 05/00 वा रवाना करुन अवैद्य दारु विक्री करणाऱ्यावर रेड करण्याबाबत मार्गदर्शन करुन आदेशीत केले. वरुन स्थानीक गुन्हे शाखाच्या पथकाने ग्राम मोहगव्हान येथील धरणाचे काठावर गावठी हात भट्टी दारु गाळणारे इसमांवर छापा टाकला असता तेथील आरोपीना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते घटनास्थळा वरुन पसार झाले. परीसराची पाहणी केली असता झाडझ् गुडुपात, तलवाच्या काठावर लपवुन ठेवलेला तसेच जमिनीमध्ये गड्डा करुन पुरुन ठेवलेल्या सडवा मोहमाचचे 10 ड्रम, 4 प्लास्टीकच्या टाक्या, 82 पिपे, 31 प्लास्टिक कँन असा एकुन 4,695 लिटर मोहामाच गावठी हातभट्टी दारु 20 लिटर असा एकुन 4,73,500/- रुपयाचा माल मिळुन आला. सदर माल पंचासमक्ष नाश करण्यात आला व यातील फरार आरोपी 01) सलीम घांसी भवानीवाले 02) मोहम्मद पिरु नंदावाले दोन्ही राहणार मोहगव्हाण यांचे विरुद्ध कलम 65 (ई) (फ) मु.प्रो. कायद्यान्वये पोलीस स्टेशन अनसिंग येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई साठी पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनी निलेश जाधव व स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या टिम ने अथक परीश्रम घेतले.

