वाशिम :- जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासुन वाशिम पोलीसांनकडुन धडक मोहिमा राबवुन वाशिम जिल्ह्यात गुन्हे करणारे गुन्हेगार यांना अटक करुन बेड्या ठोकल्या आहेत. तसेच वाशिम मध्ये मोटार सायकल चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन आसेगांव येथे फिर्यादी नामे आतिष भगवान चवरे वय 29 वर्ष रा. दस्तापुर ता मंगरुळपीर जि वाशिम यांनी तक्रार दिली की, त्यांची मोटार सायकर क्र एमएच 37 एके 5303 होन्डा शाईन कंपनीची दस्तापुर वरील रोड वर उभी असता कोणीतरी चोरट्याने चोरुन नेली. वरुन पोलीस स्टेशन आसेगांव येथे अप क्र 138/2026 कलम 303 (2) भा.न्या.सं. चा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना माहिती मीळाली असता त्यांनी पोउपनि शेखर मास्कर व पोलीस अंमलदार यांची एक टिम तयार करुन पोलीस स्टेशन आसेगांव येथे मोटार सायकल व आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केली. सदर टिम ने गोपनिय माहितीच्या आधारे आज दिनांक 12/05/2026 रोजी ग्राम साखरडोह ता. मानोरा जि. वाशिम येथुन तिन संशयित आरोपीतांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल क्र एमएच 37 एके 5303 होन्डा शाईन कंपनीची हि हस्तगत करण्यात आली. तसेच सदर आरोपीतांनी पोलीस स्टेशन अकोट फैल जि. अकोला येथुन एक मोटार सायकल. पोलीस स्टेशन दहीहांडा जि. अकोला येथुन एक मोटार सायकल, पोलीस स्टेशन बोराखेडी जि. बुलढाणा येथुन सुध्दा मोटार सायकल चोरी करुन घरातील दागीने व नगदी रक्कम व पोलीस स्टेसन वाशिम शहर येथे सुध्दा लाखाळा परीसरातील पानपट्टी फोडुन त्यामधील मुद्देमाल व रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांकडुन 04 मोटार सायकल, 01 टॅप, 01 मोबाईल, नगदी 5000/- रुपये व चोरी करण्या करीता वापरण्यात येणारे साहीत्य असा एकुन 3,55,300/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीतांचे नांव 01) राहुल राजेश भगत वय 21 वर्ष रा साखरडोह ता मानोरा जि वाशिम 02) अजय भारत डाखोरे वय 21 वर्ष रा इंदीरा आवास सोनगीरी झोपडपट्टी बार्शिटीकळी जि अकोला. 03) योगेश पप्पु तायडे वय 21 वर्ष रा इंदीरा आवास सोनगीरी झोपडपट्टी बार्शिटीकळी जि अकोला असे असुन सदर आरोपीतांना पोलीस स्टेशन आसेगांव च्या ताब्यात देण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे. जिल्ह्यात चोरी गेलेल्या आणखी मोटार सायकल मिळण्याची दाट शक्यता आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मँडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोउपनि / शेखर मास्कर व टिम ने अथक परीश्रम घेतले आहे.

