वाशिम : – जिल्हा परिषद, वाशिमच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजना अंतर्गत डी.एड./बी.एड. अर्हता प्राप्त उमेदवारांची ११ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयात दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत.
सन २०२५-२६ मध्ये युवा शिक्षक प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी चालू वर्षासाठी अर्ज सादर करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक डी.एड./बी.एड. उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केली आहे

