वाशिम :- जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयात अवैधरित्या गोवंश वाहतुकीवर कडक कारवाईच्या सुचना केल्या आहेत त्यानुसार आज दिनांक 12/04/2026 रोजी दोन ट्रकमधुन गोवंशाची वाहतुक होतअसल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा वाशिम ला मिळाल्यावरुन सकाळी 05.30 च्या दरम्यान ग्राम कळंबा महाली, वाशिम मंगरुळपीर रोडवर सापळा रचुन संशयीत वाहन क्रमांक MH 04 FU 5246 व MH 44 440यांना अडवुन तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबुन ठेवलेले गोंवश बैल आढळुन आले.प्राण्यांना वाहतुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रे नसतांना वाहतुक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाई दरम्यान एकुन 30 बैल/गोवंश जनावरे तसेच 2 ट्रक असा एकुन अंदाजे 40,50,000/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआ हे. सदर इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी 1) सैय्यद अफजल सैय्यद सालार वय 29 वर्ष रा.रशीदनगर, दिवाणपुरा, मंगरुळपीर जि. वाशिम 2) नाजीमोद्दीन निजामोद्दीन वय 42 वर्ष रा. चहेलपुरा, मंगरुळपीर असे सांगितले वरुन संबधीत आरोपीतांविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे दाखल करण्यातआला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे सर, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड मॅडम, पोलीस निरीक्षक श्री प्रदिप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि जगदीश बांगर स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर स्थागुशा, वाशिम व टीम स्थागुशा ने अथक परिश्रम करुन केली आहे.
जिल्हयात अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशी हालचालींबाबत त्वरीत पोलीसांना माहिती दयावी असे आवाहन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी केले आहे.

